साल आहे १९९३. इंग्लंडमधले उन्हाळ्यातले दिवस आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा चालू. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरला बहुचर्चित अॅशेस मालिकेतला पहिला कसोटी सामना. इंग्लंडची बॅटिंग चालू आहे. माईक गॅटिंग खेळतोय. समोरून गोबरे गाल, गळ्यात सोन्याची साखळी, ओठाला आणि नाकाला सनस्क्रीन लोशन थापलेला, फुल बाह्यांचा शर्ट घातलेला आणि सोनेरी केसांचा एक २३-२४ वर्षांचा मुलगा ओव्हर द विकेट बोलिंग करायला आलाय. त्याच्या पहिल्या अॅशेसच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या स्पेलमधला पहिलाच चेंडू.`