माईंडफूलनेसबद्दल समजून घेताना मानवी भावना, विचार आणि कृती यांबद्दल समजून घ्यावे लागते. आपण जीवनात वावरत असताना कर्ता आणि भोक्ता म्हणून वावरत असतो. याच कृती करताना साक्षीभावाने केल्या तर आपण त्यात गुंतून पडत नाही. हा साक्षीभाव म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी कर्ता, भोक्ता आणि साक्षी या तीनही संकल्पना डॉ.यश वेलणकर यांच्याकडून समजून घ्यायलाच हवे.