संदीपच्या अनेक कविता कार्यक्रमांमधून किंवा इतर माध्यमातून आपल्या पर्यंत पोहोचल्या. परंतु त्याच्या प्रकाशित पुस्तकांमधल्या स्टेजवर अजिबात न वाचलेल्या,फार कमी वाचलेल्या तसेच अप्रकाशित कविता सुद्धा या मालिकेत आहेत. सॊबतच मधुराणी गोखले यांच्या सोबत कविता आणि तत्सबंधी तसेच जीवनाविषयीच्या इतर पैलू वरती सुदधा संदीप जिव्हाळ्याने भरभरून बोलला आहे. तेव्हा गप्पा संवादासोबत जीवनाचे अनेक नवीन पैलू उलगडणाऱ्या कविता नक्की ऐका स्टोरीटेलवर ,मधुराणी गोखले आणि संदीप खरे यांच्या बहारदार आवाजात.