हे प्रोडक्ट कोण्या एका खासगी कंपनीचं नसल्यामुळे व त्या प्रोडक्टचा कुणी एक हिरो/नायक नसल्यामुळे ते कदाचित आपल्या लक्षात येत नाही. हे 'मेड इन इंडिया' व जगभर चालू शकेल असं जागतिक दर्जाचं प्रोडक्ट म्हणजे अर्थातच 'युनिफाईड पेमेंट इंटरफेस' म्हणजेच युपीआय! आज तुम्ही हा लेख वाचताय याचा अर्थ असा, की तुमच्या मोबाईलमध्येसुद्धा एखादं तरी युपीआय अॅप नक्कीच आहे. मग तुम्ही म्हणाल की अरे, आम्ही अॅप्स तर वेगवेगळी वापरतोच पण ती तर वेगवेगळ्या कंपन्यांची आहे; मग युपीआय नक्की आहे तरी काय? पेटीएम असुदे, किंवा फोनपे, गुगल पे असूदेत, ज्याचं आधीचं नाव 'तेज' होतं, हे सगळे केवळ अॅप्लिकेशन्स आहेत. या अॅप्लिकेशन्सच्या आत काम करणारी टेक्नॉलॉजी ही अस्सल भारतीय आहे, जी एनपीसीआय (नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने बनवली आहे.