'हम को मन की शक्ति देना' ही प्रार्थना आणि 'गोली मार भेजे में' हे आगाऊ गाणं एकाच व्यक्तिचं आहे, ह्यावर कोणाचा विश्वास बसेल? बरं गंमतीची गोष्ट अशी की, जेव्हा कल्लू मामा गाणं लिहिलं तेव्हा या गीतकाराची साठी पार झाली होती. गाणं ऐकून वाटत नाही ना? पण हे व्यक्तीमत्वच तसं बहारदार आहे, की ते असं काही लिहू शकतं यात फारसं आश्चर्य नाही. या प्रतिभावंत कवीचं नाव आहे, 'गुलजार'.