सध्या भारतातील पाच राज्यामध्ये निवडणुकीचा माहोल आहे. त्यासाठी प्रचाराच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जात आहेत. त्यातीलच एक व्हिडिओ तुमच्या बघण्यात आला असेल... या व्हिडिओत अरविंद केजरीवाल गोव्यातल्या एका नागरिकाला त्याचं पूर्ण नाव घेऊन आवाहन करतायेत की, तुम्ही आमच्याच पक्षाला मत द्या. आणि असा पर्सनलाइज्ड व्हिडीओ गोव्यातल्या प्रत्येक मतदारांसाठी केला आहे अशी बातमी आहे. गोव्याची लोकसंख्या जर का आपण लक्षात घेतली तर सोळा ते वीस लाख लोकांसाठी त्यांचं नाव घेऊन वेगवेगळं व्हिडिओ शूट करणं, अगदी जरी दोन-दोन सेकंदाची नावे असली तरी एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला अजिबातच शक्य नाही. मग अशा वेळेला प्रत्येक व्यक्तीचे नाव घेऊन वेगळा व्हिडिओ कसा तयार केला जातोय? प्रचाराच्या या नव्या युक्तीमागे काय गौडबंगाल आहे? जाणून घेऊया…