आपल्या कसदार अभिनयातून रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपलं खास स्थान निर्माण केलेला कलाकार पुष्कर श्रोत्री म्हणजे एक आगळे व्यक्तिमत्व. `टाइम मशीन` च्या माध्यमातून त्यानं आता स्टोरीटेल वर पदार्पण केलंय. आपले आदर्श, आपली जडणघडण, त्यात दडलेला संघर्ष, आपल्यावरील भाषेवरील संस्कार, आपले कलेबाबतचे विचार, प्रभाव टाकणारी पुस्तकं.... अशा कित्येक विषयांना स्पर्श करतानाच स्टोरीटेल वर साकारलेल्या 'टाइम मशीन' या अफलातून निर्मितीचा अनुभव.... पुष्कर श्रोत्री यांना ऐकताना आपण हरखून जातो, हे नक्की. ऐका, स्टोरीटेल कट्ट्यावर रंगलेली उर्मिलासोबतची ही झकास गप्पांची मैफल. स्टोरीटेल वर पुष्कर श्रोत्रीच्या आवाजातील, आणि सध्या गाजत असलेली `टाइम मशीन` ऐकण्यासाठी क्लिक करा- https://bit.ly/2BFzmcj स्टोरीटेल वरील हजारो गोष्टींचा ३० दिवस निःशुल्क आणि अमर्याद आस्वाद घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://bit.ly/374hvr0