आधुनिक अर्थशास्त्राचा आद्य प्रवर्तक म्हणून ओळख असलेला ॲ़म स्मिथ हा अठराव्या शतकातील एक स्कॉटिश अर्थ शास्त्रज्ञ, तत्वज्ञ होता. त्याला भांडवलशाहीचा जनक म्हणूनही लोक ओळखतात. अर्थशास्त्राला नैतिकतेचे परिमाण जोडणारा हा अर्थतज्ञ. जे सगळे आहे ते आमच्यासाठी, आमच्या हस्तकांसाठी, नाहीरे वर्गासाठी काहीच नाही' अशी संकुचित विचारसरणी जगाच्या सर्वच सत्ताधा-यात दिसते. अशावेळी त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम वेल्थ ऑफ नेशन्स ने केले.