२१०१३ साली कॅपिटल इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी हे थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थ तज्ञाचं पुस्तक प्रकाशित झालं आणि अर्थशास्त्राच्या क्षेक्षात खूपच खळबळ माजली. १८ व्या शतकापासून अमेरिका आणि युरोप इथे संपत्ती आणि मिळकत यांच्यातील विषमता किती प्रचंड वाढली आहे यावर त्याने प्रकाशझोत टाकला. बाजारपेठेवर अवलंबून असणा-या मुक्त बाजारपेठेत जे कोणी वारसाहक्काने संपत्ती मिळवतील तेच भाग्यवान ठरतील असे त्याने म्हटले आहे.